अकोला - जिल्ह्यात एकाच दिवशी पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आतापर्यंतचा एका दिवसांत जिल्ह्यात झालेल्या मृत्यूच्या संख्येतील सर्वांत मोठा आहे. आतापर्यंत 51 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 22 जण हे पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.
अकोल्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; तर, 22 जण पॉझिटिव्ह - अकोला कोरोना न्यूज
जिल्ह्यात एकाच दिवशी पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आतापर्यंतचा एका दिवसांत जिल्ह्यात झालेल्या मृत्यूच्या संख्येतील सर्वांत मोठा आहे. आतापर्यंत 51 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 22 जण हे पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत.
प्राप्त अहवालात सात महिला व 15 पुरुष आहेत. त्यातले मोठी उमरी येथील दोन, शंकर नगर येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन, सिंदखेड येथील दोन तर उर्वरित शिवाजीनगर, देवी खदान, गाडगे नगर, नवाबपूरा, खेडेकर नगर, खदान, भांडपुरा, अकोट फ़ैल, तार फ़ैल, गायत्री नगर, गुलजार पुरा,वाडेगाव व बाळापूर येथील रहिवासी आहेत. एका अहवालातील एक रुग्ण हा वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील असून तो वाशीम जिल्हा रुग्णालयातून संदर्भित आहे. त्याच्यावर अकोला येथेच उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आज पाच मृत्यू नोंद झाली आहेत. त्यात-
अकोट फ़ैल येथील 68 वर्षीय महिला (3 जूनला दाखल), शंकर नगर येथील 53 वर्षीय पुरुष (10 जूनला दाखल), बाळापूर येथील 55 वर्षीय महिला (13 जूनला दाखल), बापूनगर येथील 58 वर्षीय पुरुष (3 जून दाखल), सिंधी कॅम्प येथील 56 वर्षीय पुरुष (12 जूनला दाखल - हा रुग्ण आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता.) यांचा समावेश आहे.
*प्राप्त अहवाल-९३
*पॉझिटीव्ह-२२(२१+१)
*निगेटीव्ह-७१
आता सद्यस्थिती
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१००७
*मयत-५१(५०+१)
*डिस्चार्ज-६२५
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३३१