महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

कोरोनाची भीती दूर करण्यासाठी जनप्रबोधन आवश्यक - मत्स्य विकासमंत्री अस्लम शेख

कोणत्याही परिस्थितीत कोरोना उपचाराबाबत हलगर्जीपणा होणार नाही. याकडे लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी केल्या. कोरोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भीती असली तरी घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

thane corona news
thane corona news

By

Published : Jun 6, 2020, 7:36 PM IST

ठाणे - कोरोनाबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भीती आहे. कोरोनाविषयीची भीती जनतेच्या मनातून दुर करण्यासाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे प्रबोधन करण्याच्या सुचना मत्स्य विकासमंत्री अस्लम शेख यांनी दिल्या. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा मंत्री शेख यांनी घेतला. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, भिवंडी मनपा आयुक्त आष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांसह मनपा व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शेख यांनी जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थिती आणि त्यावर सुरू असलेल्या उपाययोजनांची यावेळी माहिती घेतली. कोणत्याही परिस्थितीत कोरोना उपचाराबाबत हलगर्जीपणा होणार नाही. याकडे लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी केल्या. कोरोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भीती असली तरी घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या डॅशबोर्डच्या माध्यमातून सर्व जनतेला उपलब्ध करुन द्या. आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडे प्राप्त तक्रारीचे निराकरण करुन नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यावर भर देण्यात यावा. कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराला परतवून लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. समाज माध्यमातून चांगल्या बाबींची माहिती लोकांना द्या, असेही ते म्हणाले. एखादी व्यक्ति परदेशातून आल्यानंतर त्यासाठी विलगीकरण कक्ष तयार ठेवा. नव्याने ऊभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर देण्यात यावा, अशा सुचना शेख यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या संबंधित सर्व उपाययोजनांची माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details