बीड - जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ज्या गतीने वाढ झाली, त्याच गतीने रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. जिल्ह्यात एकूण 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 52 रुग्ण बरे झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असल्याचे डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले. तर रविवारी बीड शहरातील झमझम कॉलनीमध्ये 61 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ही व्यक्ती हैदराबाद येथून प्रवास करून बीडमध्ये आलेली आहे.
बीडमध्ये 63 पैकी 52 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज
जिल्ह्यात या घडीला 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी एकूण 15 व्यक्तींचे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी एक 61 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.
जिल्ह्यात या घडीला 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी एकूण 15 व्यक्तींचे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी एक 61 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. ही व्यक्ती हैदराबाद येथून प्रवास करून दोन दिवसांपूर्वीच बीड शहरात दाखल झाली होती. बीडमध्ये आल्यानंतर या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर तपासणी करण्यात आली होती.
सध्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील 3, पाटोदा 2, गेवराई 1, धारूर 4 तर परळी येथील 1 रुग्णाचा समावेश असण्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे.