महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

सातारा : एकाच दिवसात 59 रुग्ण कोरोनामुक्त; 18 नव्या रुग्णांची नोंद - सातारा कोरोना न्यूज

कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणारे 18, सह्याद्री हॉस्पिटल मधील 10, खावली येथील कोरोना केअर सेंटर येथील 6 रूग्ण, बेल एअर हॉस्पिटल पाचगणी येथील 5 आणि मायणी मेडिकल कॉलेज येथील 8 अशा एकूण 47 रुग्णांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.

satara corona news
satara corona news

By

Published : Jun 9, 2020, 3:05 PM IST

सातारा -जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून तो आता 649 वर जाऊन पोहवला आहे. हा आकडा जरी वाढत असला तरी कोरोनातून बरे होणा-या रूग्णांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 59 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर 18 नव्या रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणारे 18, सह्याद्री हॉस्पिटल मधील 10, खावली येथील कोरोना केअर सेंटर येथील 6 रूग्ण, बेल एअर हॉस्पीटल पाचगणी येथील 5 आणि मायणी मेडिकल कॉलेज येथील 8 अशा एकूण 47 रूग्णांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. तर रात्री पाटण तालुक्यातील 4 आणि वाई तालुक्यातील 8 रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा खंडाळा तालुक्यातील भादवडे या गावातील ज्येष्ठ नागरिकाचा सारी या आजाराच्या उपचारादरम्यान मृत्यु झाला. कोरोना संशयित म्हणून या रूग्णाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या रुग्णाला चार वर्षांपासून मधुमेहाचाही त्रास होता. त्यावर ते उपचार घेत होते. रात्री उशिरा 131 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

252 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले -

दरम्यान, सोमवारी 252 जणांचे कोरोनाचे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय 29, शिरवळ 20, कराड 53, फलटण 22, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 37, वाई 73, रायगाव 7, मायणी 1, बेल एअर, पाचगणी येथील 10 असे एकूण 252 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

18 नव्याने बाधित रुग्ण -

जिल्हयातील 8 महिला आणि 10 पुरुष अशा 18 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

कोरेगाव : गिघेवाडी येथील 5.

वाई : व्याजवाडी 1, पाचवड 1, बोरीव - 1

जावळी : भणंग 1, धोंडेवाडी 1, पिंपळवाड 1.

खटाव : वडगाव 1, पळसगाव 1.

महाबळेश्वर : दाभेकर 1.

माण : वडजल 3, भालवडी 1

ABOUT THE AUTHOR

...view details