महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

औरंगाबादेत कोविड-19 रुग्णसंख्या सोळाशे पार, कोरोनाचे नवे 55 रुग्ण - Aurangabad covid-19 patient news

खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील 64 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा 1 जूनला रात्री 11.30 वाजता खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत घाटीत 63, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 15, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 79 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद कोरोना न्यूज
औरंगाबाद कोरोना न्यूज

By

Published : Jun 2, 2020, 1:08 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आणखी 55 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1 हजार 642 झाली आहे. यापैकी 1 हजार 49 कोरोनाबधित बरे होऊन घरी गेले आहेत. 79 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 514 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये शहा बाजार (1), किराडपुरा (2), चंपा चौक (1), कटकट गेट (1), नारळीबाग (1), गणेश कॉलनी (1), जवाहर नगर (3), भीम नगर (2), हमालवाडी (1), शिवशंकर कॉलनी (2), नाथ नगर (2), ज्योती नगर (1), फजलपुरा परिसर (1), मिल कॉर्नर (1), एन-3 सिडको (1), एमजीएम परिसर (1), रोशन गेट (1) , विशाल नगर, गारखेडा परिसर (1), एन-सहा संभाजी कॉलनी (7), समता नगर (5), अंहिसा नगर (1), मुकुंदवाडी (1), विद्या निकेतन कॉलनी (1), न्याय नगर (1), बायजीपुरा (2), संजय नगर, मुकुंदवाडी (4), विजय नगर (2), यशवंत नगर, पैठण (1), चंपा चौक, म्हाडा कॉलनी (1), नेहरु नगर (1), जुना मोंढा नाका परिसर (1), अन्य (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 24 महिला आणि 31 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.


खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील 64 वर्षीय पुरुष कोरोनबाधिताचा 1 जून रोजी रात्री 11.30 वाजता खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 63, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 15, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 79 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details