महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

निसर्ग चक्रीवादळ : मुंबईतील हजारो झाडांना धोका.. 7 पट झाडे उन्मळतील? - निसर्ग चक्रीवादळ मुंबई न्यूज

मुंबईत पावसात 16 किमी वेगाने वारे वाहतात. तर पहिल्या दोन आठवड्यात 100 तरी झाडे उन्मळून पडतात. तर संपूर्ण पावसाळ्यात 1000 हून अधिक झाडे उन्मळून पडतात, अशी माहिती पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी दिली आहे.

निसर्ग चक्रीवादळ न्यूज
निसर्ग चक्रीवादळ न्यूज

By

Published : Jun 3, 2020, 3:14 PM IST

मुंबई -निसर्ग चक्रीवादळाचा धोका मुंबईला मोठा असून त्याचा फटका येथील शेकडो झाडांनाही बसणार आहे. दरवर्षी मुंबईत पावसाळ्यात जितकी झाडे उन्मळतात, त्याच्या किमान 7 पट झाडे आज आणि उद्या उन्मळून पडतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर यासंबंधी आवश्यक ती काळजी घेण्यासाठी मुंबई महानगर पालिकेला विनंतीही केली आहे.

मुंबईत पावसात 16 किमी वेगाने वारे वाहतात. तर पहिल्या दोन आठवड्यात 100 तरी झाडे उन्मळून पडतात. तर संपूर्ण पावसाळ्यात 1000 हून अधिक झाडे उन्मळून पडतात, अशी माहिती पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी दिली आहे.

या वादळात 120 किमी तासाने वारे वाहणार असल्याने झाडांची मोठी हानी होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान पर्यावरण प्रेमी रोहित जोशी यांनी काल पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहीत झाडांना या चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार आहे, तेव्हा तत्काळ स्वतंत्र वृक्ष सहायता हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणी केली होती. पण अद्याप तरी अशी हेल्पलाईन सुरू झाल्याची माहिती नाही, असे जोशी यांनी सांगितले आहे.

चक्रीवादळ धडकण्याआधीच मुंबईत दुपारी झाडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज आणि उद्या मोठ्या संख्येने झाडे उन्मळण्याची पर्यावरणप्रेमींची शक्यता खरी ठरत आहे. कफ परेड येथे एक झाड पडले असून चर्चगेट येथे ही झाड कोसळले आहे. त्यामुळे आता झाडांना फटका बसण्यास सुरवात झाली आहे. जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार मरीन ड्राईव्ह, वरळी सी फेस, द्रुतगती मार्ग, मोठे रस्ते या लगतच्या झाडांना याचा फटका बसेल. 2006 मध्ये चेन्नईत वरद चक्रीवादळामुळे 1 लाख अर्थात एकूण झाडांच्या 70 टक्के झाडे कोसळली होती. मुंबईत ही आता 120 किमी वेगाने वारे वाहणार असल्याने पावसाळ्यात दरवर्षी जेवढी झाडे पडतात त्याच्या 7 ते 8 पट झाडे पडतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details