येवला ( नाशिक) -पावसाने दडी मारल्याने शेती पिके धोक्यात आली आहेत. येवला तालुक्यातील पारेगाव येथे टोमॅटो उत्पादक शेतकरी राजू सय्यद हे टोमॅटोचे पीक वाचविण्यासाठी मगा, बादली, तांब्याने पाणी देतानाचे चित्र बघायला मिळाले.
हेही वाचा -Chhagan Bhujbal : 'विधानपरिषदेवर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील'
पिकाला ताब्याने पाणी -येवला तालुक्यातील पारेगाव येथील राजू सय्यद या शेतकऱ्याने पाऊण एकरमध्ये टोमॅटोचे पीक घेतले आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने या शेतकऱ्यावर पीक वाचविण्यासाठी तांब्याने, बादलीने पिकाला पाणी घालण्याची वेळ आली आहे. पाऊस पडावा अशी प्रतीक्षा तालुक्यातील शेतकरी करीत आहे. या शेतकऱ्याला टोमॅटो पीक लागवडीकरिता 40 ते 45 हजार रुपये खर्च आला असून, जर लवकर पाऊस पडला नाही तर केलेल्या पूर्ण खर्चासह पीक वाया जाईल. इकडून तिकडून पाणी आणून पीक वाचविण्याची धडपड शेतकऱ्यांकडून चालू आहे.
आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता - आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची ( Maharashtra Monsoon Update ) शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ( Monsoon news today Maharashtra ) आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात सोमवारपासून अतिमुसळधार ( Monsoon Konkan weather today ) पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढण्याची ( Mumbai monsoon 2022 prediction ) शक्यता आहे.
हेही वाचा -नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत, तुरळक ठिकाणी पेरणीस सुरवात