कोलकाता - आयपीएलमध्ये आंद्रे रसेल नावाचे वादळ चांगले गाजत आहे. बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात त्याने २ चौकार आणि ९ षटकारांची आतषबाजी करत २५ चेंडूत तुफानी ६५ धावा केल्या. हा सामना कोलकाता हरला तरी या खेळीने क्रिकेटप्रेमींची मने नक्कीच जिंकली. सामना जिंकून देण्यास त्याने जीव तोडून प्रयत्न केला, पण अखेर कोलकाताचा १० धावांनी पराभव केला.
..आंद्रे रसेलची डीएनए टेस्ट करा; क्रिकेट फॅन्सने केली मागणी - fans demands andre russell dna test after his fiery inning against rcb
आंद्रे रसेले यंदाच्या आयपीएलमध्ये ८ डावात सर्वाधिक ३९ षटकार ठोकले आहेत. तसेच केकेआरच्या संघाकडून खेळताना सर्वाधिक १०० षटकार मारले आहे.
रसेलची ही तुफानी खेळी पाहून फॅन्स देखील चकित झाले. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका फॅनने पोस्टरवर रसेलचा डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली. त्या फॅनचा फोटो आंद्रे रसेलने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
आंद्रे रसेलने यंदाच्या आयपीएलमध्ये ८ डावात सर्वाधिक ३९ षटकार ठोकले आहेत. तसेच केकेआरच्या संघाकडून खेळताना सर्वाधिक १०० षटकार मारले आहेत. गोलंदाजीतही त्याने उत्कृष्ठ कामगिरी करत ५० गडी बाद केले. अशी कामगिरी करणार तो केकेआरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. याचसोबत त्याने यंदाच्या मोसमात ३५२ धावा केल्या आहेत.
TAGGED:
आंद्रे रसेल