महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

भंडाऱ्यात खोटे नियुक्ती पत्र देऊन साडेचार लाखांची फसवणूक.. तोतया पत्रकाराला अटक - Job fraud Bhandara

चार महिन्या अगोदर आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक साठवणे यांनी चौकशी सुरू केली. सुरुवातीला अरुण गजभिये याला अटक केली, तर स्वानंद चौरे याला आज अटक केली आहे. तर यांचा तिसरा साथीदार राजन मेश्राम सध्या फरार आहे.

Fake reporter arrest bhandara
Fake reporter arrest bhandara

By

Published : Jun 28, 2020, 3:37 PM IST

भंडारा- एका नामांकित पेपरचा पत्रकार आहे असे सांगून लोकांना नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका तोतया पत्रकाराला भंडारा शहर पोलिसांनी आज अटक केली. नोकरीच्या नावाखाली आरोपीने त्याच्या साथीदारांसाह 4 लाख 50 हजार घेतले होते. दीड वर्षाआधी हा गुन्हा दाखल झाला होता. मात्र कारवाई आता करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाईसाठी एवढा उशीर का केला, हा एक संशोधनाचा विषय आहे.

स्वानंद चौरे असे अटक केलेल्या पत्रकाराचे नाव आहे. पोलीस त्याला अटक करण्यासाठी शुक्रवारी त्याच्या घरी पोहोचले होते, मात्र याची माहिती घरच्यांनी स्वानंद चौरे याला देताच तो घरी परतलाच नाही. मात्र पोलीस त्याच्या मागावरच होते. रविवारी सकाळी तो घरी आल्याचे माहिती होताच पोलिसांनी त्याला त्याच्या घरून अटक केली.

स्वानंद चौरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी 2019 मध्ये मुस्लिम लायब्ररी चौकात एक ऑफिस उघडले होते. येथे लोकांना नोकरी देण्याच्या नावाखाली गंडवण्याचे काम सुरू होते. या लोकांनी सलेभाटा प्राथमिक आरोग्य केंद्रात कौन्सिलर पदासाठी खोटे नियुक्ती पत्र देऊन 3 लोकांकडून प्रत्येकी 1 लाख 50 हजार रुपये असे एकूण 4 लाख 50 हजार रुपये घेतले होते. मात्र ते नियुक्ती पत्र खोटे असल्याने त्यांचा बिंग फुटला. लोकांनी त्यांचे पैसे परत मागितले, मात्र या भामट्यांनी त्यांना निवळ खोटी आश्वासने दिलीत. आपली पूर्णपणे फसवूनक झाली आहे हे लक्षात आल्यावर तिन्ही लोकांनी भंडारा पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली. मात्र मागील दीड वर्षात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

4 महिन्या अगोदर आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक साठवणे यांनी चौकशी सुरू केली. सुरवातीला अरुण गजभिये याला अटक केली, तर स्वानंद चौरे याला आज अटक केली आहे. तर यांचा तीसरा साथीदार राजन मेश्राम सध्या फरार आहे.

स्वानंद चौरे हा मुळात लोकांची तेल मालिश करून कुटुंब चालवायचा. मात्र माहितीचा अधिकार सुरू झाल्यानंतर याने काही गरीब महिलांना हाताशी घेऊन त्यांच्या नावावर माहितीच्या अधिकारातून शाळेची, शासकीय विविध कामांची माहिती मागण्याचे काम सुरू केले. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत त्रुटी दिसल्यास त्यांना पैसे मागण्याचा नवीन व्यवसाय त्याच्या हाती लागला होता. ज्यांनी पैसे नाही दिले आशा लोकांची माहिती एका वृत्तपत्राच्या जिल्हा प्रतिनिधीला देत होता. त्या पेपरला बातम्या लागल्या की, मी या पेपर मध्ये पत्रकार आहे, असे सांगत, मुळात पेपरचा प्रतिनिधी नसतानाही तो पत्रकार म्हणूनच जिल्ह्यात मिरवत होता. आज त्याचा खरा चेहरा पुढे आला असून भविष्यात लोकांनी या झोलाछाप पत्रकाराला न घाबरता त्यांनी कोणत्याही कारणास्तव पैशांची मागणी केल्यास त्याची तक्रार पोलिसात करावी.

तसेच, पोलिसात दीड वर्षापूर्वी तक्रार होऊनही पोलिसांनी अजूनपर्यंत कारवाई का केली नाही, याबाबत वरिष्ठांनी सत्य शोधून काढावे. अन्यथा लोकांनचा पोलिसांवरील विश्वासाला तडा जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details