पालघर -हलक्या प्रतीचे मद्य विदेशी बाटल्यांमध्ये भरून त्याची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. वसई तालुक्यातील वाळीव येथे ही टोळी कार्यरत होती. विभागाने या ठिकाणी छापा टाकून जवळपास 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हेही वाचा... कराडमध्ये राडा... दारूचे पैसे देण्यावरून वेटर आणि हॉटेल मालकास जबर मारहाण; 8 जणांवर गुन्हा दाखल
वसईतील वाळिव येथे कमीत कमी चार ते पंचवीस हजार रुपये किमतीच्या दारुची अवैधरित्या विक्री होत आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर विभागाने ही कारवाई केली. हलक्या प्रतीचे मद्य तयार करून किंवा विकत घेऊन त्यांना विदेशी लेबल असलेल्या बाटल्यांमध्ये भरले जात असे. त्यानंतर त्याची विक्री करण्याचे काम ही टोळी करत होती. वसई तालुक्यातील वाळीव येथे अधिकाऱ्यांनी छापा टाकून, हलक्या प्रतीचे मद्य तसेच विदेशी रिकाम्या बाटल्या मोठा साठा जप्त केली. जवळपास 7 ते 8 लाख रुपये किंमतीचा हा मुद्देमाल असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.