तिवरे धरण फुटल्याने २३ जण गेले वाहून, ८ मृतदेह हाती; २ वर्षांपासून गळती होती सुरू
रत्नागिरी -चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून जवळपास २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी ८ मृतदेह हाती लागले आहे. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. तिवरे भेंदवाडीतील काही घरं पाण्याखाली गेली आहेत. गुरं ढोर पाण्यात वाहून गेली आहेत. तिवरे धरण फुटल्याने नजीकचा दादर पूलही पाण्याखाली गेला. ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे, सती, गाणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, २ वर्षांपासून धरणाची गळती सुरू होती. वारंवार तक्रार करूनही ती दुरस्त केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे....वाचा सविस्तर
आमचं इथं कोणीचं दिसना....काळरात्रीची घटना प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून
रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटले आणि होत्याचे नव्हते झाले. या धरणाशेजारी असलेल्या भेंडेवाडीतील जवळपास 12 ते 15 कुटुंबातील 24 माणसं बेपत्ता झाली. कामानिमित्त शहरात असलेले घटनेची माहिती कळताच रात्रीच घटनास्थळी आले. मात्र, त्यांना दिसला तो चिखल, वाहून गेलेली घरं, मोडलेले वासे. त्यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. कोणाचे आई-वडील गेले होते, तर कोणाचे भाऊ, कोणाचा मुलगा, मुलगी तर कोणाचं अख्य कुटुंबच वाहून गेलं होतं. आपलं कोणीच दिसत नाही, हे पाहून अनेकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकत होता....वाचा सविस्तर
पानशेत ते तिवरे व्हाया सावित्री; राज्यातल्या या आहेत 'महादुर्घटना'