महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

इयॉन मॉर्गनच्या नावे इंग्लंडकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम - eoin-morgan-

जेम्स अँडरसनला हा विक्रम मोडण्याची संधी होती. पण त्यानेही एकदिवसीय क्रिकेट ऐवजी कसोटी क्रिकेटला प्राध्यान्य दिले.

इयॉन मॉर्गन

By

Published : May 15, 2019, 2:57 PM IST

ब्रिस्टल - इंग्लंड संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गनने एक नवा इतिहास घडविला आहे. मॉर्गनने इंग्लंडकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. इयॉन मॉर्गन हा एकेकाळी आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. त्याने २००६ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.


डबलिन येथे जन्मलेल्या मॉर्गनने २००६ साली स्कॉटलंडविरुद्ध पहिला सामना खेळला होता. त्यानंतर त्याने एकूण २२ सामन्यात आयर्लंड संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यानंतर तो इंग्लंड संघाकडून खेळू लागला. मॉर्गनने मंगळवारी पाकिस्तानविरुद्ध १९८ वा एकदिवसीय सामना खेळला.


यापूर्वी पॉल कॉलिंगवुडने इंग्लंडकडून १९७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कॉलिंगवुडने २०१५ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जेम्स अँडरसनला हा विक्रम मोडण्याची संधी होती. पण त्यानेही एकदिवसीय क्रिकेट ऐवजी कसोटी क्रिकेटला प्राध्यान्य दिले. त्यालाही इंग्लंडकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम करण्याची संधी होती. ती संधी त्याने गमावली.


इंग्लंडकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारे खेळाडू

  • इयॉन मॉर्गन १९८ सामने
  • पॉल कॉलिंगवूड १९७ सामने
  • जेम्स अँडरसन १९४ सामने
  • अॅलेक स्टुअर्ट १७० सामने
  • इयान बेल १६१ सामने

ABOUT THE AUTHOR

...view details