ब्रिस्टल - इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनला आयसीसीने एका वनडे सामन्यासाठी निलंबित केले आहे. एवढेच नाही, तर त्याला सामन्यातील मानधनाच्या ४० टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. आयसीसीचे एलीट पॅनलमधील पंच रिची रिचर्डसन यांनी मॉर्गनवर निलंबनाची कारवाही केली आहे.
इयॉन मॉर्गन एका सामन्यासाठी निलंबित, आससीसीची कारवाई - Eoin Morgan
मॉर्गनवर बंदी घातल्याने त्याला शुक्रवारी होणाऱ्या चौथ्या वनडे सामन्यात खेळता येणार नाही.
इंग्लंड संघाने निर्धारित वेळेत २ षटके कमी टाकली आहेत. संघाच्या इतर खेळाडूंवर सामन्यातील २० टक्के दंड लावण्यात आला आहे. मॉर्गन या आधी २२ फेब्रुवारीला बार्बाडोस येथे विंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात षटकांची गती कमी राखण्यात दोषी आढळला होता. गेल्या १२ महिन्यांत त्याच्यावर दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर एका सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
मॉर्गनवर बंदी घातल्याने त्याला शुक्रवारी होणाऱ्या चौथ्या वनडे सामन्यात खेळता येणार नाही. तसेच इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयअस्टोने तिसऱ्या सामन्यात आयसीसीच्या आचार संहिता नियमाचे भंग केल्याने त्याला आयसीसीने फटकारले आहेत. त्याच्या खात्यात एका डिमेरिट गुणांची नोंदही करण्यात आली आहे. बेयअस्टोने सामन्यात बाद झाल्यानंतर त्याची बॅट स्टम्पवर आदळली होती. त्याने त्याची चूक कबूल केली आहे.