लंडन - आयसीसी विश्वचषक स्पर्धेला ३० मेपासून सुरूवात होत आहे. यासाठी सर्वच संघांची घोषणा झाली आहे. मात्र यातच इंग्लंड संघाची डोकेदुखी वाढतच चालली आहे. सध्या इंग्लंडच्या खेळाडूंना दुखापतीने घेरले आहे. असे असतानाच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातून अलेक्स हेल्सचे नाव वगळण्यात आले आहे.
आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध होणाऱया मालिकेतूनही त्याचे नाव काढून टाकण्यात आले आहे. उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याप्रकरणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर या आधीच २१ दिवसांची बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा आता क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत त्याची विश्वचषकाच्या संघातून हाकलपट्टी केली.