महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

निवडणूक भरारी पथकाकडून तीन ठिकाणांहून ७५ लाखांची रोकड जप्त

आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी सुरू

By

Published : Apr 19, 2019, 2:21 PM IST

निवडणूक भरारी पथकाकडून ७५ लाखांची रोकड जप्त

मुंबई- निवडणुकीत प्रचारासाठी अनधिकृतपणे वापरण्यात येणाऱ्या पैशांवर निवडणूक आयोग व मुंबई पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येते. मुंबई शहरात गुरुवारी तीन वेगवेगळया ठिकाणांहून निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ७५ लाख रुपयांची संशयित रक्कम पकडली आहे. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

निवडणूक भरारी पथकाकडून ७५ लाखांची रोकड जप्त

गुरुवारी (१८ एप्रिल) मुंबईतील गोल देऊळ एस.व्ही.पी रोड, या परिसरातून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील स्थिर तपासणी पथकाने एमएच.४ ईएच. ३२१२ या कारची तपासणी केली असता गाडीमध्ये प्रदिप निसार, शांतीलाल निसार आणि महेश गाला हे तीन जण आढळून आले असता या तिघांच्या ताब्यातून १० लाख रुपये रक्कम आढळून आली.

दुसरीकडे मुंबईतील भायखळा परिसरात तांबीट नाका, बी.जे. रोड येथे संकेत पेखळे यांच्या स्थिर तपासणी पथकाने सायंकाळी ओला गाडी क्र. एमएच.४३ बीजी. २८४३ या गाडीची तपासणी केली असता, गाडीत एकुण ४९ लाख ९८ हजार ५०० रुपये रक्कम आढळून आली.

निवडणूक आयोग भरारी पथकाचे अनिल रामचंद्र मोहिते यांच्या स्थिर तपासणी पथकाने ई.एम. पाटणवाला मार्ग, राणी बागजवळ, भायखळा येथे ईको स्पोर्ट्स फोर्ड एमएच १२ क्यूवाय. ३९६४ या वाहनाची तपासणी केली असता, त्यात १५ लाख रुपये आढळून आले. या तिन्ही प्रकरणांबाबत आयकर विभागाला कळवण्यात आले असून आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details