कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील बँक ऑफ इंडियाच्या दारात शेड नसल्याने नागरिकांना कधी पावसात तर कधी अनेकवेळा उन्हात उभे राहावे लागत असल्याची बातमी ईटीव्ही भारतने दिली होती. या बातमीचीची दखल घेत आता बँकेच्या दारात मंडप घालण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांची होणारी गैरसोय थांबली आहे.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : कोतोलीमधील बँक ऑफ इंडियाने घातला मंडप, नागरिकांची गैरसोय झाली दूर - Kotoli bank of india news
सोशल डिस्टन्सच्या नियमांमुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या बाहेर कधी उन्हात तर, कधी पावसात तासन तास उभे राहावे लागत होते. ही बातमी ईटीव्ही भारतने दिल्यानंतर आता बँकेनी दखल घेत बँकेच्या दारात मंडप घातला आहे. त्यामुळे आता नागरिकांची होणारी गैरसोय थांबली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सगळीकडे सोशल डिस्टन्स राखण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत, मात्र दुसरीकडे सोशल डिस्टन्समुळे बँकेच्या आलेल्या नागरिकांना बँकेच्या बाहेर उन्हात आणि कधी पावसातही उभे राहावे लागत होते. याबद्दल ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर आता बँकेच्या बाहेर मंडप घातण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर झाली आहे.
एकीकडे कोतोली येथे कोरोनाचे 100हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर, मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत वारंवार सांगावे लागते. मात्र एकीकडे सोशल डिस्टन्सबाबत सूचना देत असताना नागरिकांना ऊन आणि पावसाचा सामना करावा लागू नये, यासाठी शेडची तरी व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र, काही दिवसांपूर्वी येथील बँकेच्या दारात काही जण पावसातच उभे असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर हक्काच्या पैशांसाठी नागरिकांना पावसात उभे राहावे लागते, अशा आशयाची बातमी ईटिव्ही भारतने प्रकाशीत केली. त्यानंतर तात्काळ या बातमीची दखल घेत बँकेने नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली आहे. शिवाय बँकेचे व्यवस्थापक चंद्रकांत कुंभार यांनी, कायमस्वरूपी शेडबाबत सुद्धा पाठपुरावा करण्यात येत असून हे कामही लवकरच पूर्ण होईल अशी माहिती दिली आहे.