महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

दहावी, बारावीचा निकाल लांबणार? उत्तरपत्रिका तपासणीलाही कोरोनाचा फटका - mumbai corona news

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळात नुकत्याच एका महिला नियंत्रकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून त्यांच्याकडे बहुतांश पेपर तपासण्याचे काम शिल्लक राहिले आहे. यापैकी काही पेपर तपासले असून काही पेपर तपासण्याचे शिल्लक राहिले असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष संदीप सांगावे यांनी शुक्रवारी व्हिडिओ प्रेस द्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

mumbai news
mumbai news

By

Published : Jun 12, 2020, 4:24 PM IST

मुंबई -राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात मुंबई आणि परिसरात उत्तरपत्रिका तपासणाऱ्या नियंत्रकांना आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याचा सर्वात मोठा फटका उत्तरपत्रिका तपासणीवर झाला असून याची इत्यंभूत माहिती मुंबई विभागीय मंडळाकडून रोज घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळात नुकत्याच एका महिला नियंत्रकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून त्यांच्याकडे बहुतांश पेपर तपासण्याचे काम शिल्लक राहिले आहे. यापैकी काही पेपर तपासले असून काही पेपर तपासण्याचे शिल्लक राहिले असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष संदीप सांगावे यांनी शुक्रवारी व्हिडिओ प्रेस द्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

देशातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने कोरोनाची लागण झालेल्या महिला नियंत्रिकेला अगोदर आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देत त्यांची आत्तापर्यंत विचारपूस करण्याचे काम केले असल्याचेही सांगवे यांनी सांगितले. यासोबतच मुंबई आणि परिसरात अनेक परिक्षा नियंत्रक आणि त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर क्वारंटाईन होण्याची वेळ आली होती. ही संख्या फार थोडी जरी असली तरी त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम धिम्यागतीने होत असल्याची माहितीही शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष यांनी दिली.

दरम्यान, मुंबई विभागीय मंडळात दहावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम 2 हजार 346 निंत्रकांना देण्यात आले आहे. त्यातील आतापर्यंत 1 हजार 984 नियंत्रकांनी आपल्याकडील उत्तरपत्रिका मंडळाकडे जमा केल्या आहेत. तर बारावीच्या 1 हजार 642 नियंत्रकांपैकी 1 हजार 203 जणांनी उत्तरपत्रिका तपासून मंडळाकडे जमा केल्या आहेत. तर दहावी आणि बारावीच्या तब्बल 861 नियंत्रकांकडून अद्यापही उत्तरपत्रिका तपासून येणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details