धुळे - लोकसभा मतदार संघाचे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. यावेळी बोलतांना डॉ भामरे म्हणाले गेल्या ५ वर्षात आम्ही जी विकास कामं या मतदार संघात केली, ती विकास काम घेऊन आम्ही या निवडणुकीत जनतेसमोर जात आहोत. धुळे लोकसभा मतदार संघासाठी अडीच हजार कोटी रुपयांचा निधी आणण्यात आम्ही यशस्वी झालो.
धुळ्यातील काही शिवसैनिकांनी काँग्रेसची सुपारी घेतली आहे - डॉ. सुभाष भामरे - Shivsena
गेल्या ५ वर्षात आम्ही जी विकास काम केली ती विकास काम जनतेसमोर घेऊन आम्ही जात आहोत. धुळे लोकसभा मतदार संघासाठी निधी आणण्यात आम्ही यशस्वी झालो आणि यानंतर जनतेने संधी दिली तर या मतदार संघाचा विकास घडवून आणू असं आश्वासन डॉ. सुभाष भामरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना दिले.
डॉ. सुभाष भामरे
या मतदार संघातील पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवला, तसेच इतर विकास काम मार्गी लावली. शिवसेनेच्या नाराज गटाबाबत बोलतांना डॉ. भामरे म्हणाले शिवसेनेच्या काही लोकांनी काँग्रेसची सुपारी घेतली आहे म्हणून ते काँग्रेसची भाषा बोलतात असा आरोप त्यांनी यावेळी केला. गेल्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत देखील मोदी लाट आहे. यामुळे जनता मोदींना पंतप्रधान बनवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.