पुणे- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कोरोनाच्या महामारीमुळे होणार की नाही? असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आषाढी वारीची परंपरा अखंडीत ठेवले जाणार आहे. मात्र पालखी सोहळ्याचे स्वरूप शासनाशी चर्चा करुनच ठरवले जाणार असल्याची माहिती, मुख्य विश्वस्त अॅड. विकास ढगे-पाटील यांनी दिली.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अखंडीत सुरू राहणार.. शासनाशी चर्चा करुन ठरवणार धोरण
आषाढी वारीही शेतकरी, वारकरी यांच्यासाठी वरदान समजली जाते. या आषाढीवारीचा पायी प्रवास केल्यानंतर वर्षभर वेगळी उर्जा मिळते, अशी अनेकांची भावना आहे. त्यामुळे वारीच्या परंपरेसोबत अनेकांच्या भावना जोडल्या आहेत.
हेही वाचा-COVID-19 India tracker: जाणून घ्या कोरोनाची राज्यनिहाय आकडेवारी
कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा होणार की नाही?. याबाबत वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आज मुख्य विश्वस्त, दिंडी सोहळा प्रमुख आणि दिंडी मालकांची, चोपदार, दाभाडे सरकार यांच्यात व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यात सर्वानुमते आषाढीवारी सोहळा करण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, वारीच्या स्वरुपाबाबत राज्यसरकार सोबत दोन प्रतिनिधी बैठक घेऊन नियमावली ठरवतील असा निर्णय घेण्यात आला.
आषाढी वारीही शेतकरी, वारकरी यांच्यासाठी वरदान समजली जाते. या आषाढीवारीचा पायी प्रवास केल्यानंतर वर्षभर वेगळी उर्जा मिळते, अशी अनेकांची भावना आहे. त्यामुळे वारीच्या परंपरेसोबत अनेकांच्या भावना जोडल्या आहेत. त्यामुळे ही वारी अखंडीत सुरू ठेवणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले.