वर्धा -जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शनिवारी दुपारी अचानक शहरातील मुख्य बाजारातील कृषि केंद्रांची पाहणी केली. यावेळी कृषि केंद्र व्यावसायिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी व्यवसायिकांच्या बियाणांच्या स्टॉक रजिस्टरची तपासणी केली. शिवाय यंदा बियाण्यांचा तुटवड्याबाबतही अधिकची माहिती जाणून घेतली. प्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शनिवारी थेट कृषि केंद्रात जाऊन बियाणे खरेदीसाठी आलेल्या काही शेतक-यांसह कृषि केंद्र व्यावसायिक मनोज भुतडा, रवी बन्नोरे, बिसानी यांच्याशी संवाद साधला. शिवाय त्यांनी विदर्भ अॅग्रो कृषि केंद्रासह सुमारे आठ कृषि केंद्रांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी कृषि केंद्रांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना, खत व बियाणे यांचा तुटवडा, तसेच यंदा शेतक-यांकडून कुठल्या पिकाच्या बियाण्यांची मागणी जास्त आहे. या विषयची माहिती जाणून घेतली.