महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

धनुषच्या 'अंग्रेजी लव्ह शव' या गाण्याला मिळतोय तुफान प्रतिसाद - Angrezi love shuve

मेगास्टार धनुषच्या अंग्रेजी लव्ह शव या तामिळ गाण्याचे हिंदी वर्जन रिलीज झाले आहे. आगामी 'द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर' या हॉलिवूड चित्रपटात हे गाणे वापरण्यात आलंय. रिलीज झाल्यानंतर काही तासातच या गाण्याला सुमारे चार लाख व्हिव्ह्ज मिळाले आहेत.

मेगास्टार धनुष

By

Published : Jun 10, 2019, 8:31 PM IST


मुंबई - 'द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर' या आगामी हॉलिवूड चित्रपटात 'अंग्रेजी लव्ह शव' हे गाणे समाविष्ठ करण्यात आले आहे. बॉलिवूड गायक अमित त्रिवेदीने गायलेल्या या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळत असताना दिसतोय.

अभिनेता धनुषने 'इंग्लिसू लव्हेसू' हे गाणे तामिळ भाषेत गायले होते. 'कोलावरी ढी' या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर धनुषने हे गाणे गायले होते. याच गाण्याचे हिंदी वर्जन अमित त्रिवेदीने 'द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर' या चित्रपटासाठी गायले आहे.

अमित त्रिवेदी यांनी संगीबध्द करुन गायलेल्या 'अंग्रेजी लव्ह शव' या गाण्याला सर्व थरातील प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत या ३ लाख ९१ हजार व्हिवर्सनी पाहिले आहे. मदन कार्कि यांनी हे गीत तामिळमध्ये लिहिले होते. याचे हिंदी व्हर्जन अन्विना दत्त यांनी लिहीले आहे.

या अप्रतिम गाण्याबद्द बोलताना दिग्दर्शक केन स्कॉट यांनी म्हटलंय, ''भारतात टॅलेंटचा खजिना आहे आणि धनुष, अमित यांनी या गाण्यासाठी घेतलेली मेहनत मी खूप जवळून पाहिली आहे.''

'द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर'हा चित्रपट येत्या २१ जून रोजी जगभर अनेक भाषांमध्ये रिलीज होतोय.

ABOUT THE AUTHOR

...view details