मुंबई- माझ्यासारख्या नेत्याने त्यावर प्रतिक्रिया देऊ नये. राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तसेच शरद पवारांची मुलाखत ही नुरा कुस्ती आहे, असा पलटवार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विरोधी पक्षामधील नेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरत आहेत, असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी लगावला होता. त्यावर फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली
फडणवीस आदित्य ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले, "खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येते. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतेच असे नाही ना? ते (आदित्य ठाकरे) नवीन आहेत. माझ्यासारख्या माणसाने त्यावर फार काही प्रतिक्रियाही देऊ नये.” तसेच, विरोधी पक्ष काय करतो, यापेक्षा लोकांना अधिकाधिक मदत कशी करता येईल आणि प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहील यावर सरकारने भर द्यायला हवा, असेही फडणवीस म्हणाले.