मुंबई - देशात मान्सूनचा 12 जूनपर्यंतचा प्रवास पाहता तो वेगाने पुढे जात आहे. आज, मान्सूनने चांगली प्रगती करत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वाटचाल केली. तसेच विदर्भ आणि छत्तीसगडचे काही भाग पार केले आणि पश्चिम बंगालमध्येही हजेरी लावली. कोलकाता येथेही आगमन झाले असून आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश येथे मान्सून प्रगती करत आहे. सिक्कीमच्या सर्वच भागात मान्सून पोहोचला असून पावसाला सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती स्कायमेट या हवामान विषयक खासगी संस्थेने दिली आहे.
...असा असेल देशभरातील मान्सूनचा प्रवेश - monsoon this year news
देशातील मध्य आणि पूर्वेच्या अनेक भागात 10 ते 15 जूनच्या दरम्यान मान्सून पोहोचतो. मुंबई आणि कोलकात्यात मान्सूनच्या आगमनाची तारीख ही 11 जून आहे. आज मान्सूनने कोलकात्यात हजेरी लावली, मुंबईला अद्याप प्रतीक्षा आहे. रांची, भागलपूर आणि दरभंगा येथे मान्सून सामान्य वेळेवर येईल. बिहारला पार केल्यानंतर 15 जूननंतर मान्सूनची प्रतीक्षा पूर्व उत्तर प्रदेशात सुरू होणार आहे.
या आधी 11 जूनला दक्षिण-पश्चिम मान्सूनने चांगली प्रगती केली. महाराष्ट्रात मान्सूनने प्रवेश केला. दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशामध्ये हजेरी लावली. ईशान्य भारतातही मान्सूनची गती वाढत आहे. देशातील कृषी प्रधान राज्यात मान्सूनच्या आगमनाबरोबर शेतीची कामेही वाढणार आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र क्षेत्राबरोबरच छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांना शेतीची कामे वाढवणे सोपे जाणार आहे. मध्य प्रदेश, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात मान्सूनची प्रतीक्षा असणार आहे. तेथील नागरिक मान्सूनचा आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. आतापर्यंतचा दक्षिण-पश्चिम मान्सूनचा वेग पाहता या भागातही मान्सून लवकरच पोहोचेल. पुढील 24 ते 48 तासात मान्सून महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या इतर भागात पोहोचेल. ओडिशामध्ये प्रगती होईल तर, बिहार आणि झारखंडच्या पूर्व भागात आगमन होईल.
देशातील मध्य आणि पूर्वेच्या अनेक भागात 10 ते 15 जूनच्या दरम्यान मान्सून पोहोचतो. मुंबई आणि कोलकात्यात मान्सूनच्या आगमनाची तारीख ही 11 जून आहे. आज मान्सूनने कोलकात्यात हजेरी लावली, मुंबईला अद्याप प्रतीक्षा आहे. रांची, भागलपूर आणि दरभंगा येथे मान्सून सामान्य वेळेवर येईल. बिहारला पार केल्यानंतर 15 जूननंतर मान्सूनची प्रतीक्षा पूर्व उत्तर प्रदेशात सुरू होणार आहे. प्रयागराज वाराणसी, बलिया, गोरखपूर, आझमगड, बस्ती आणि आसपासच्या क्षेत्रात मान्सून हजेरी लावू शकतो. याच दरम्यान मध्य प्रदेशच्या दक्षिण पूर्व भागात मान्सूनचे आगमन होऊ शकते, असे स्कायमेट या हवामान विषयक खासगी संस्थेने सांगितले आहे.