महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

कोरोनासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडतायत डेंगीचे रुग्ण - corona news sindhudurg

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग या आजारांचा प्रामुख्याने समावेश होतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभाग आणि हिवताप विभागाच्या समन्वयाने या कार्यक्रमाची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येते.

sindhudurg news
sindhudurg news

By

Published : Jun 16, 2020, 10:44 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आतापर्यंत हिवतापचे 2 तर डेंगीचे 20 रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या हिवताप विभागाकडून देण्यात आली आहे. अगोदर कोरोना आणि आता पावसाळा सुरु झाल्याने जिल्ह्यात डेंगीने डोके वर काढले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात डेंगीचे 124 रुग्ण आणि हिवतापाचे 38 रुग्ण आढळले होते. त्यात हिवतापाने एका रुग्णाचा मृत्यूही झाला होता. ही बाब लक्षात घेता खबरदारीच्या उपाय योजनेसाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग या आजारांचा प्रामुख्याने समावेश होतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभाग आणि हिवताप विभागाच्या समन्वयाने या कार्यक्रमाची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुसार पावसाळ्याचा हंगाम हा किटकजन्य आजारासाठी जोखमीचा असल्याने जून हा संपूर्ण महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून सध्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कोणताही ताप हा हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया असू शकतो हे लक्षात घेऊन ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात रक्त तपासून घ्यावे. आरोग्य यंत्रणेकडून दिलेले निर्देश आणि सूचनांचे पालन करून साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी जनतेने आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन हिवताप विभागामार्फत करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details