औरंगाबाद -बेगमपुरा भागातील एका महिलेला कॉल गर्ल म्हणून छायाचित्र आणि मोबाईल क्रमांक दुसरयांना पाठवून महिलेची बदनामी करणाऱ्यांविरोधात बेगमपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद : कॉल गर्ल म्हणून महिलेची बदनामी; बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Woman defamation case begampura police station news
बेगमपुरा भागातील एका महिलेचा फोटो व मोबाईल क्रमांक व्हायरल करुन महिला कॉल गर्ल असल्याची बदनामी करणारा मेसेज पसरवला. यामध्ये मंगेश वाखारे नावाच्या व्यक्तीने दुसऱ्या एकाला व्हाॅटसअॅपवर संबंधित महिलेचा मोबाईल क्रमांक पाठविला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगमपुरा भागातील एका महिलेचा फोटो व मोबाईल क्रमांक व्हायरल करुन महिला कॉल गर्ल असल्याची बदनामी करणारा मेसेज पसरवला. यामध्ये मंगेश वाखारे नावाच्या व्यक्तीने दुसऱ्या एकाला व्हाॅटसअॅपवर संबंधित महिलेचा मोबाईल क्रमांक पाठविला.
दरम्यान, दुसऱ्या संशयित मोबाईलधारकाने महिलेस फोन करून तिला लज्जास्पद बोलला. यावेळी महिलेने जाब विचारला असता वखरे याने मोबाइल नंबर दिल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेला अनोळखी क्रमांकावरु फोन आल्याने मनस्ताप झाला. यानंतर महिलेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.