गोंदिया - विनयभंग प्रकरणात कारागृहात असलेले भाजप आमदार चरण वाघमारे यांची अखेर बुधवारी पाचव्या दिवशी सुटका झाली. मंगळवारीच त्यांना 5 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र, काल कागदपत्रे कारागृहात पोहोचवण्यासाठी विलंब झाल्याने त्यांची सुटका झाली नव्हती. त्यामुळे आज सकाळी दहा वाजता त्यांची सुटका करण्यात आली.
हेही वाचा -आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावातील लोकांचे रोजगारासाठी परप्रांतात पलायन
मी पूर्वीपासूनच जामीन घेण्यास नकार दिला होता. मात्र, कारागृहात असताना वरिष्ठांनी आदेश दिल्यामुळे त्यांच्या आदेशाचे पालन करावे आणि जामीन अर्जावर स्वाक्षरी केली, असे कारागृहातून निघताच त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. निवडणुकीत अपक्ष लढण्याची तुमची तयारी आहे का? असे विचारले असता, कार्यकर्त्यांचे मत विचारून त्यांची इच्छा असेल तर अपक्षही निवडणूक लढवू, असेही त्यांनी सांगितले.