रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनारुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. तर, आजपर्यंत 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू हे दापोली तालुक्यात झाले असून, दापोलीत कोरोनामुळे 10 जणांचा बळी गेला आहे.
रत्नागिरी : दापोली तालुक्यात कोरोना रुग्ण मृत्यूदर जिल्ह्यात सर्वाधिक - ratnagiri corona updates
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून कोरोनामुळे आजपर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकट्या दापोली तालुक्यात कोरोनामुळे 10 जणांचा बळी गेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान कोरोनामुळे आजपर्यंत जिल्ह्यात 42 जण दगावले आहेत. काहींचा मृत्यू हा उपचारादरम्यान झाला आहे, तर काहीजण उपचारापूर्वीच दगावले, ज्यांचे अहवाल नंतर पॉझिटिव्ह आले. यापैकी एकट्या दापोली तालुक्यात 10 जणांचा कोरोनामुळे झाला आहे. त्याखालोखाल चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात मृतांची संख्या आहे, या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर संगमेश्वर तालुक्यात 6 जण कोरोनामुळे दगावले असून खेड तालुक्यात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राजापूर आणि गुहागरमध्ये प्रत्येकी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर लांजा आणि मंडणगडमध्ये एक एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सध्या 84 ॲक्टिव्ह कन्टेटमेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावे, दापोलीमध्ये 7 गावांमध्ये, खेडमधील 23 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 17 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3, गुहागर तालुक्यात 6 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कन्टेटमेंट झोन आहेत.