चेन्नई- आयपीएलच्या १२ व्या मौसमात आज दोन सामने होणार आहे. पहिला सामना एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगणार आहे. चेन्नईने आतापर्यंत ४ सामने खेळला आहे. त्यातील ३ सामन्यात विजय तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. पंजाबनेही ३ विजय आणि १ पराजय पाहिला आहे. आजच्या सामन्यात पंजाबी शेर चेन्नईच्या घरच्या मैदानावर डरकाळी फोडणार की चेन्नई बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
या सामन्यात महेंद्र सिंह धोनी आणि आर.अश्विन यांच्यात भिंडत पाहायला मिळेल. आर. अश्विन हा बरीच वर्षी आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत होता. हा सामना भारतीय वेळेनुसार ४ वाजता सुरू होईल.
दोन्ही संघातील खेळाडूंची नावे