महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

साताऱ्यात लग्नाला 50 पेक्षा जास्त वऱ्हाडी, गुन्हा दाखल - सातारा लग्न न्युज

साताऱ्यात लग्नात 50 पेक्षा जास्त वऱ्हाडीची गर्दी झाली. त्यामुळे संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सातारा
सातारा

By

Published : Apr 10, 2021, 7:05 PM IST

सातारा : कोरोना पार्श्वभूमीवर लग्न समारंभासाठी प्रशासनाने केवळ 50 जणांना परवानगी दिली आहे. मात्र, सत्तरहून अधिक वऱ्हाडी मंडळी ठोसेघर (ता. सातारा) येथील जमले होते. त्यामुळे संबधितांवर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल

अप्पाजी भगवंत चव्हाण (रा. ठोसेघर, ता. सातारा), यशवंत खाशाबा जाधव (रा. घोटेवाडी, ता.पाटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक हेमंत ननावरे यांनी फिर्याद दिली आहे.

नियम मोडल्यास कडक कारवाईचे आदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने लग्नात केवळ पन्नास लोकांना उपस्थितीचा नियम लागू केला आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी न करता सर्रास नियमांची पायमल्ली होत असल्याने कडक कारवाईच्या सुचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

म्हणून गुन्हा दाखल

ठोसेघर (ता.सातारा) येथे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या मुलांचा लग्न समारंभ आयोजित केला होता. त्या सोहळ्याला केवळ 50 लोकांची परवानगी होती. मात्र, 70 हून अधिक लोकांची गर्दी जमल्याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हांकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस नाईक हेमंत ननावरे यांना कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार ननावरे यांनी ठोसेघर येथे जावून गर्दीबाबत मिळालेल्या माहितीची खात्री करून घेतली आणि दोघांवर गुन्हा दाखल केला.

ABOUT THE AUTHOR

...view details