कराची- इंग्लंडमध्ये ३० मेपासून विश्वकरंडकापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघासाठी आंनदाची बातमी आहे. पाकिस्तान बोर्डाने अष्टपैलू शादाब खान याला फिट घोषित केले आहे. २० वर्षीय शादाब खानला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात सामील करून घेतले होते. पण तो आजारी असल्याने त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले. मात्र, आता तो फिट असल्याचे सांगण्यात आले आहे.
शादाब लंडनमधील ब्रिस्टल येथे ३१ मेपूर्वी संघात दाखल होईल, अशी माहिती प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी दिली. विश्वकरंडकात पाकिस्तानचा पहिला सामना विंडीजसोबत ३१ मे रोजी नॉटिघम येथे होणार आहे.