महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

मनमाडमध्ये कोरोनाचा कहर ; कोरोना रुग्णांची संख्या ४० वर - nashik corona update

तब्बल अडीच महिने एकही रुग्ण नसलेल्या शहारत आज घडीला कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 40 झाली असून यापैकी रूग्ण उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर 29 रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत.

nashik corona news
corona influence at manamad nashik district

By

Published : Jun 6, 2020, 5:39 PM IST

मनमाड (नाशिक) -देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज (शनिवार) मनमाड शहरात नवीन 8 रुग्णांची भर पडली आहे. एकाच कुटुंबातील तब्बल ७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या रूग्णांमध्ये अनुक्रमे 5 व 7 वर्षीय लहान मुली आणि एका 6 वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. यात अजून एका तरुणाचा देखील अहवाल पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

सध्या मनमाड शहरात कोरोनाबधितांची एकूण संख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 11 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर उरलेल्या 29 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मनमाडची लोकसंख्या जवळपास सव्वालाखांच्या आसपास आहे. मनमाडमध्ये रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. प्रशासकीय स्तरावर देखील मनमाडला कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव होण्याचा ईशारा देण्यात आला होता. मात्र, तब्बल अडीच महिने एकही रुग्ण नसलेल्या शहारत आज घडीला कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 40 झाली असून यापैकी रूग्ण उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर 29 रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत.

दोन दिवसांपूर्वी कॉलेज जवळील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्याच्या घरातील सदस्यांचे अलगीकरण करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज (शनिवारी) प्राप्त झाले. त्यापैकी 7 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यात 5 व 7 वर्षीय लहान मुली, तर एक 6 वर्षीय मुलाचा समावेश असुन या लहान मुलांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर पालिकेच्या रुग्णाचे स्वॅब घेण्यात आले त्यात एक पालिका कर्मचारी देखील पॉझिटीव्ह आढळून आला होता. त्याच्या मुलाचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो देखील पॉझिटीव्ह झाला आहे. त्यामुळे प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, अनेक ठिकाणी बॅरेकेटिंग करण्यासह औषध फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पालिकेच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यासाठी रात्रंदिवस कर्मचाऱ्यांच्या गाड्या फिरत असुन नागरिक सुचनांचे पालन करत नसल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो. अनेक ठिकाणचे भाग सील करून येण्या-जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. तसेच औषध फवारणी सुरू आहे. नागरिकांना वेळोवेळी आवाहन करत आहोत. काही जण प्रतिसाद देतात तर काही जण कोरोनाच्या या परिस्थितिला गंभीरपणे घेत नाहीत. अशांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details