नाशिक- शहरात 55 वर्षीय कोरोना संशयित व्यक्तीचा ॲम्बुलन्समधून पळ काढताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती कल्याण वसतिगृह येथील कोविड केअर सेंटरमधील एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आली होती. कोरोनाच्या भीतीमुळे या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले.
सदर संशयित व्यक्तीला 4 जुलै रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 5 जुलै रोजी त्याचा कोरोना तपासणी नमुना घेण्यात येणार होता. या संशयित्यास कुठलाही प्रकारचा त्रास होत नव्हता. परंतु, त्याने मला खाजगी रुग्णालयात जायचे आहे असे सांगितले. परंतु कोणत्या रुग्णालयात याबाबत त्यानी काहीच सांगितले नाही. डॉक्टरांनी त्याला विविध पर्याय दिले, परंतु त्याला त्यानी नाही म्हणून सांगितले. डॉक्टरांनी त्यास समजवण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु तो काही ऐकण्यास तयार नव्हता म्हणून त्याला शेवटी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात नेण्याकरता अथवा त्याच्या आवडीच्या रुग्णालयात पाठविण्याकरिता ॲम्बुलन्समध्ये बसविण्यात आले.