यवतमाळ -नेर येथील 83 वर्षीय व्यक्तिचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. कोरनामुळे मृत्यू झालेल्या या व्यक्तिमध्ये सारी या आजाराची सुद्धा लक्षणे होती. या रूग्णाचा कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला.
यवतमाळ : नेर येथील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू - latest corona news update yavatmal
वैद्यकीय महाविद्यालयाला शनिवारी सकाळपासून 35 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले. या अहवालापैकी मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित 34 अहवाल नेगेटिव्ह आले आहे. विलगीकरण कक्षामध्ये भरती असलेले दोन रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह मधून नेगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाला शनिवारी सकाळपासून 35 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले. या अहवालापैकी मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित 34 अहवाल नेगेटिव्ह आले आहे. विलगीकरण कक्षामध्ये भरती असलेले दोन रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह मधून नेगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितित अॅक्टिव कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 22 आहे. आतापर्यंत 143 रूग्ण हे कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 168 कोरोनाचे पॉजिटिव्ह झाले असून कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रूग्णांची संख्या 3 वर गेली आहे.