औरंगाबाद- पैठण नपच्या स्वच्छता विभागात कार्यरत एक स्वच्छता कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आल्याने नपच्या एका आधिकारीसह 8 कर्मचार्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आले असून 7 पैकी एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या मंगळवारी शहरातील बरसू मोहल्यात एक वृद्ध महिला कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आली होती. तिची संपर्क साखळी पुढे वाढत जाऊन शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता 19 वर पोहोचली आहे. याच रुग्णातील साखळीतल्या एका रुग्णाच्या संपर्कात नप कर्मचार्याचा मुलगा आल्याने त्याची लागण त्या नप कर्मचार्याला झाली आणि कर्मचाऱ्याच्या परिवारातील आणखी दोघे, असे एकूण तिघांना कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.