महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

धुळ्यात कोरोनाचा उद्रेक; नव्या ४४ रुग्णांची नोंद, बाधितांची संख्या 2 हजार पार - Corona patients dhule

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर असून ठोस उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने जिल्ह्यात पुन्हा ताळेबंदी लागू करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नागरिकांनी सहकार्य न केल्यास ताळेबंदीचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jul 19, 2020, 7:58 PM IST

धुळे- जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या 2 हजाराच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यात सक्तीची ताळेबंदी करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत आलेल्या अहवालांनुसार 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 315 झाली असून आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 हजार 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील मृत्युदर देखील वाढला असून यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. मात्र कोरोनाबाधितांची संख्या वाढून देखील बाजारपेठेतील गर्दी तसूभरही कमी झालेली नाही.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर असून ठोस उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने जिल्ह्यात पुन्हा ताळेबंदी लागू करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नागरिकांनी सहकार्य न केल्यास ताळेबंदीचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details