नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा तेविसावा दीक्षांत समारंभ ४ मेला सकाळी अकरा वाजता पार पडणार आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) पार पडणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी हे भूषविणार आहेत.
राज्यपाल कोश्यारी यांच्यासह हे मान्यवर राहणार उपस्थित...!
या समारंभास मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे असणार आहेत. आदरणीय अतिथी म्हणून मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च चे संचालक प्रा. एस. रामकृष्णन हे असणार आहेत. प्रा. रामकृष्णन स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत. या समारंभासाठी राज्यशिष्टाचार प्रमाणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे.