महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

नांदेड येथे पेट्रोल डिझेल भाववाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध - Congress protest nanded

केंद्र सरकारकडून जनतेला आधार देण्याऐवजी पेट्रोल, डिझेलचे सारखे दरवाढ करून जनतेची लूट केल्या जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याचे जिल्हा सरचिटणीस संजय लहानकर यांनी सांगितले.

Congress protest nanded
Congress protest nanded

By

Published : Jul 4, 2020, 6:11 PM IST

नांदेड- पेट्रोल-डिझेल भाववाढीच्या विरोधात अर्धापूर तालुका काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालय तामसा कॉर्नर येथून पायी चालत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच, तहसीलदार सुजीत नरहरे यांना दरवाढ मागे घेण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून जनतेला आधार देण्याऐवजी पेट्रोल, डिझेलचे सारखे दरवाढ करून जनतेची लूट केल्या जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याचे जिल्हा सरचिटणीस संजय लहानकर यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, सरचिटणीस संजय लहानकर, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख लायक, युवकचे जिल्हाध्यक्ष कोंढेकर, अशोक सावंत, पप्पू पाटील पं.स.सभापती सौ. कांताबाई अशोक उपनगराध्यक्ष डॉ. पल्लवी विशाल लंगडे, माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details