अकोला - वीज वितरण कंपनी विरोधातल्या तक्रारी अधिकाऱ्यांनी तातडीने सोडवाव्या, अशा सुचना आमदार नितीन देशमुख यांनी केल्या आहेत. ग्रामीण भागात ऐन पावसाळ्यात शेतकरी वर्गाच्या आणि ग्रामस्थांच्या वीज वितरणासंदर्भात तक्रारी असतात. या तक्रारी तातडीने सोडविणे हे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. ज्यामुळे शेतकरी अधिकाऱ्यांना याचा त्रास होणार नाही. सोमवारी (15 जून) दुपारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना आमदार देशमुख यांनी याबाबत सुचना केल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या विजे संदर्भातील तक्रारी तातडीने सोडवाव्यात; आमदार नितीन देशमुखांच्या अधिकाऱ्यांना सुचना - MLA nitin deshmukh
आमदार नितीन देशमुख यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याची जाण ठेवून काम करण्याच्या सूचना केल्या. तसेच या छोट्या-छोट्या तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून प्रयत्न झालेच पाहिजे. जे अधिकारी काम करत नसतील अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करून ग्रामीण भागातील विजेच्या समस्या सोडवण्यासाठी भर देण्याचा इशारा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला.
विजेच्या तक्रारीबाबत आगर आणि उगवा येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर, कंपनीचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, कार्यकारी अभियंता यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी पडलेले विजेचे खांब, लोंबकाळणाऱ्या विजेच्या तारा, डीपी बंद पडणे, शॉर्ट सर्किट होणे, फ्यूज जाणे यासारख्या तक्रारी केल्या. या तक्रारीनंतर अधिक्षक अभियंता यांनी या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येईल. तसेच प्रत्येक गावातील सरपंच यांचा एक ग्रुप तयार करून त्यावर गावातील आलेल्या विजेच्या तक्रारींचा निपटारा करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यानंतर आमदार नितीन देशमुख यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याची जाण ठेवून काम करण्याच्या सूचना केल्या. तसेच या छोट्या छोट्या तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून प्रयत्न झालेच पाहिजे. जे अधिकारी काम करीत नसतील अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करून ग्रामीण भागातील विजेच्या समस्या सोडवण्यासाठी भर देण्याचा इशारा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला.