अमरावती- जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या कार्यालयात केअर टेकरने अध्यक्षांच्या कॅबीनमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली होती. या युवकास वेतन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षाविरोधात शहर कोतवाली पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
अमरावती : कर्मचाऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा पत्रकार संघटनेच्या अध्यक्षावर गुन्हा - Marathi patrakar sanghatna chief anil agraval
शुक्रवारी निखीलच्या आईने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन वेतन मिळाले नसल्याने निखिलने आत्महत्या केल्याची तक्रार दिली. या तक्रारीनंतर शहर कोतवाली पोलिसांनी मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
![अमरावती : कर्मचाऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा पत्रकार संघटनेच्या अध्यक्षावर गुन्हा Care taker Suicide Amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-04:45:58:1592738158-mh-amr-02-affance-ragistered-against-president-of-journalist-asosiation-vis-7205575-19062020233216-1906f-03982-614.jpg)
अनिल अग्रवाल असे गुन्हा दाखल करण्यात अलेल्या जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षांचे नाव आहे. मराठी पत्रकार भवनात केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या निखिल पाटील (25) याचा मृतदेह मराठी पत्रकार भवनात संघटनेच्या अध्यक्षांच्या कॅबिनमधल्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. गंभीर बाब म्हणजे ही घटना उघडकीस येताच निखिलची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असताना परिसरातील काही लोक त्याला हिणवत असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे आधी सांगण्यात आले. असे असताना गुरुवारी निखिलच्या आईने मुलाला तीन महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले.
शुक्रवारी निखीलच्या आईने शहर कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन वेतन मिळाले नसल्याने निखिलने आत्महत्या केल्याची तक्रार दिली. या तक्रारीनंतर शहर कोतवाली पोलिसांनी मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.