लातूर - जिल्ह्यात वनक्षेत्र कमी असले तरी हत्तीबेट सारख्या पर्यटन स्थळाचा विकास महत्वाचा आहे. हत्तीबेट हे 'ब' वर्गीय पर्यटन स्थळ असून या ठिकाणी विविध विकास कामे तसेच पर्यटनाच्या कामांसाठी कटिबद्ध असल्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या बेटावर वृक्षारोपण करण्यात आले.
हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या विकासासाठी कटिबद्ध - राज्यमंत्री संजय बनसोडे
जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या बेटाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी हत्तीबेट गडावरील सद्गुरू गंगानाथ महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
हत्तीबेट हे जिल्ह्यासाठी एक नैसर्गिक देण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे पर्यटन स्थळ विकासापासून दूर राहिले आहे. निवडणुकांच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पडतो. परंतू निवडणूक पार पाडताच सर्वच लोकप्रतिनिधींना याचा विसर पडतो. मात्र, जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या बेटाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी हत्तीबेट गडावरील सद्गुरू गंगानाथ महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. हत्तीबेटला ऐतिहासिक, धार्मिक पौराणिक महत्व आहे. या स्थळाचा विकास झाल्यास उदगीरच्या वैभवात अधिक भर पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उस्मानाबाद विभागाचे विभागीय वनाधिकारी एम. आर. गायकर आणि सामाजिक वनीकरण अधिकारी यांची उपस्थिती होती.