महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

जल विद्युत निर्मिती वाढविण्यासाठी ऊर्जामंत्री - जलसंपदा मंत्र्यांनी घेतली संयुक्त बैठक - जलविद्युत प्रकल्प क्षमता वाढ

बैठकीमध्ये महनिर्मिती कंपनीकडे भाडेपट्टी तत्वावर हस्तांतरित केलेल्या 27 जलविद्युत प्रकल्पांचा करारनामा मसुदा अंतिम करण्याबाबत, तसेच जलसंपदा विभाग व महानिर्मिती कंपनी यांच्यात प्रलंबित असलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

Minister Nitin Raut
मंत्री नितीन राऊत

By

Published : Jul 9, 2020, 11:59 PM IST

मुंबई- महाराष्ट्र राज्याची जलसंपदा क्षमता याचा आढावा घेऊन जलविद्युत प्रकल्पाची क्षमता कशी वाढविता येईल यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संयुक्त बैठक मुंबई येथे गुरुवारी (दि. 9 जुलै) घेतली.

राज्यात औद्योगिक प्रगतीमुळे विजेची मागणी वाढत आहे. सोबतच कृषी ग्राहकांकडून व घरगुती विजेच्या मागणीत दरवर्षी वाढच होताना दिसते. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात वीज खरेदी करून राज्याची गरज भागविण्याचा प्रयत्न ऊर्जा विभागाकडून होत आहे. मात्र यातून निर्माण होणारे प्रदूषण व वाढत्या दराला आवर घालून यातून मार्ग काढण्यासाठी उपलब्ध अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा शोध घेऊन येणाऱ्या पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवणे सगळ्यांचे कर्तव्य आहे, असा डॉ. राऊत यांचा मनोदय आहे. त्यामुळे, जल विद्युत प्रकल्पाची क्षमता वाढविणे व नवीन प्रकल्प तयार करण्यासाठी विचार विनिमय करण्यात आला.

सदर बैठकीमध्ये महनिर्मिती कंपनीकडे भाडेपट्टी तत्वावर हस्तांतरित केलेल्या 27 जलविद्युत प्रकल्पांचा करारनामा मसुदा अंतिम करण्याबाबत, तसेच जलसंपदा विभाग व महानिर्मिती कंपनी यांच्यात प्रलंबित असलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. जलसंपदा विभागाकडून चालविण्यात येत असलेले 8 जलविद्युत प्रकल्प परिचालन व देखभालीसाठी ऊर्जा विभागाच्या महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरित करण्याबाबतही विचार करण्यात आला.

ऊर्जा विभागाकडे जलसंपदा विभागाचे भाडेपट्टी व वीज विक्रीपोटी 2 हजार 285.11 कोटी एवढ्या रकमेच्या देयकाचे समायोजन करण्याबाबत व महानिर्मितीकडे भाडे तत्वावर हस्तांतरित केलेल्या जलविद्युत प्रकल्पांच्या मिळणाऱ्या भाडेपट्टीवर सेवाकर, तसेच जीएसटी आकारणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

35 वर्षे नियत आयुर्मान पूर्ण झालेले येलदरी, वैतरणा, भाटगर व कोयना टप्पा-3 या जलविद्युत प्रकल्पांचे नुतनीकरण, आधुनिकीकरण व क्षमतावाढ करणे व प्रकल्पांचे परिचालन व देखभाल याबाबत दिशा ठरविणे, सौर, पवन, जलविद्युत हायब्रीड प्रकल्प धोरण ठरविण्यासाठी महानिर्मिती कंपनीने तांत्रिक बाबींची तपासनी करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कोयना प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीमध्ये सेवेत सामावून घेता येऊ शकते का, याची चाचपणी करण्याचे ठरविण्यात आले. बैठकीत ऊर्जा विभागाचे प्रभारी प्रधान सचिव दिनेश वाघमारे, तसेच जलसंपदा व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details