महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

जिल्हाधिकाऱ्यांनी वर्धा शहरातील नगरपालिकेच्या कामांची केली पाहणी - वर्धा नालेसफाई

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आज शहरातील मातंगपुरा, कुटेमाटे नाला, गणेश हॉटेल, शिवनगर, पूलफैल आणि हिंद नगर भागात जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन नगरपालिकेने केलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी पावसाळ्यापूर्वी अनेक कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

Collector bhimanwar wardha
Collector bhimanwar wardha

By

Published : Jun 24, 2020, 7:48 PM IST

वर्धा - पावसाळ्याच्या कालावधीत शहरातील नाले तुंबून सखल भागात पाणी साचू नये, यासाठी वर्धा नगरपालिकेने केलेल्या नाल्यांच्या साफसफाईची पाहणी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केली. यावेळी त्यांच्याबरोबर नगर परिषदेचे मुख्याधिकारी देखील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आज शहरातील मातंगपुरा, कुटेमाटे नाला, गणेश हॉटेल, शिवनगर, पूलफैल आणि हिंद नगर भागात जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन नगरपालिकेने केलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी पावसाळ्यापूर्वी अनेक कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी नाल्यांची नियमित कचरा काढून स्वच्छता करण्याबाबत सूचना देताना प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी राहील. प्लास्टिक बंदीसाठी कडक मोहीम राबवा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेला दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details