लखनौ - उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात शनिवारी भाजप आमदार संगीत सोम यांच्या निकटवर्तीयाची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केल्याची घटना घडली आहे. मोनू अहलावत, असे आमदार संगीत सोम यांच्या प्रतिनिधीचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, मोनू घरी आपल्या खोलीत असताना त्यांच्या कुटुंबीयांना खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या खोलीकडे धाव घेतली असता त्यांना मोनू यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांचा मृत्यू अत्यंत रहस्यमय स्थितीत झाला आहे. मोनू यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.