महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

बहिण भावातील राजकीय युध्दाची कथा 'सिटी ऑफ ड्रीम' - प्रिया बापट - Hotstar

सिटी ऑफ ड्रीम ही वेब सिरीज सध्या गाजत आहे. पोलिटिकल ड्रामा असलेल्या या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट महत्वाच्या भूमिकेत आहे. तिच्याशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली.

'सिटी ऑफ ड्रीम' - प्रिया बापट

By

Published : May 11, 2019, 7:05 PM IST

Updated : May 11, 2019, 8:35 PM IST

सिटी ऑफ ड्रीम ही वेब सिरीज सध्या हटस्टारवर खूप गाजत आहे. हा एक पोलिटिकल ड्रामा आहे. ३ मेला ही मालिका लाँच झाली आणि प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिलाय. अतुल कुलकर्णी, सिध्दार्थ चांदेकर आणि प्रिया बापट ही तिन मोठे मराठमोळे स्टार यात आहेत. आमच्या प्रतिनिधीने प्रियाशी केलेली ही बातचीत.

'सिटी ऑफ ड्रीम' - प्रिया बापट

प्रश्न - या मालिकेबद्दल थोडक्यात काय सांगाल ?
सिटी ऑफ ड्रीम हा एक पॉलिटिकल ड्रामा आहे. हॉटस्टारवर ३ मेला ही मालिका आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ते १० एपिसोड पाहा, अशी सर्वात पहिली माझी विनंती असेल.
सिटी ऑफ ड्रीममध्ये भावा आणि बहिणीमध्ये आपल्या वडिलांची खुर्ची मिळवण्यासाठी युध्द आहे. इतकेच नाही तर यात व्यक्तीरेखेचे वेगवेगळे पदर आहेत. सुरुवातील एक गृहिणी वाटणारी महिला पुढे जाऊन ती बदलते अशी माझी पूर्णिमा गायकवाड ही व्यक्तीरेखा आहे. ती फक्त मुलगी असल्यामुळे अनेक गोष्टी तिला मिळालेल्या नाहीत. तिच्या आयुष्यात एक प्रसंग येतो की, मला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर मला एक रस्ता निवडावा लागेल. तिचा हा प्रवास म्हणजेच सिटी ऑफ ड्रीम आहे. याशिवाय अनेक सारे ट्रॅक यात आहेत. मुंबई ही एक स्वप्नांची नगरी आहे, इथं येणारे प्रत्येक जण एक स्वप्न घेऊन येतो, ही गोष्ट आहे.

प्रश्न - हा पॉलिटिकल ड्रामा असल्यामुळे याची काही खास तयारी केली होती ?

प्रिया - नाही खास अशी तयारी केली नाही. मी फक्त स्क्रिप्ट फॉलो केली. मी जर एखाद्या राजकीय व्यक्तीला फॉलो केले असते तर माझ्या व्यक्तीरेखेहून वेगळे झाले असते. पण मी अनेक पॉलिटिशयन्सची भाषणे ऐकली, ते सभेत कसे बोलतात हे पाहिले...पण मी कुणा एकाचेच नाही तर अनेकांची भाषणे ऐकली. दुसरे म्हणजे अनेक नेटवर व्हिडिओ आहेत ज्यातून त्यांची बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली. त्याचा मी अभ्यास केला.

प्रश्न - ही व्यक्तीरेखा साकारणे तुझ्यासाठी किती सोपे होते?
प्रिया - खूप कठिण होते, कारण मी जशी आहे त्याहून ही व्यक्तीरेखा साकारणे अवघड होते. कारण आपण अशी व्यक्ती पाहिलेली नाही ती व्यक्ती पोर्ट्रेट करणे खूप अवघड होते. त्यामुळे शूटींगच्या काळात मी खूप संयम ठेवला कारण पूर्णिमा गायकवाड ही शांत व्यक्तीरेखा आहे त्यामुळेच हे जास्त अवघड होते.

प्रश्न - आतापर्यंत तुम्ही अनेक सिनेमातून काम केले आहे. ही वेब सिरीज करताना वेगळे काय वाटले ?

प्रिया - डिजीटल प्लॅटफॉर्म हे आपले फ्यूचर आहे. कारण प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतो. मला यातल्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या एक म्हणजे दिग्दर्शकाला आपल्याला हवी तशी गोष्ट सांगण्याचा फ्रिडम आहे. दुसरे म्हणजे यात बॉक्स ऑफिस किंवा टीआरपीची फिकीर नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांसाठी आशय मांडू शकता.

प्रश्न - सेटवर मजा मस्ती होत होती का ?

प्रिया - इथं बिल्कुल मजा मस्ती नव्हती कारण इथे आमच्या व्यक्तीरेखा ग्रे आहेत.कारण प्रत्येकात काही चांगले आहे काही वाईट आहे त्यामुळे प्रत्येकाला फोकस्ड राहायचे होते. पण ब्रेकमध्ये आणि पॅकअपनंतर थोडा टाईमपास करायचो.

प्रश्न - ही व्यक्तीरेखा पाहून क्रिटिक्स काही टिका करतील याची चिंता वाटते का ?
प्रिया - तुम्ही एक स्टँड घेऊ काही करीत असाल तर लोक तर काहीतरी बोलणारंच. लोकांना बोलू द्या, तुम्ही तुमचे काम करीत राहा. कारण मी जो काम केले आहे ते केवळ एक मिनीटाच्या क्लिप पुरते मर्यादित नाही. कारण हा आठ तासाचा मोठा प्रवास आहे जी पूर्णिमा पार करते. ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. लवकरच लोकांच्या नजरा बदलतील अशी अपेक्षा आहे.

प्रश्न - खासगी आयुष्यात पॉलिटिक्स फॉलो करते का ?

प्रिया - नाही. पण मी मतदान करुन माझे मत व्यक्त करीत असते.

प्रश्न - मराठी सिनेमा आणि हिंदीत काम कराताना काय वेगळेपणा जाणवतो?
प्रिया - वेगळेपणा काहीच नाही. मराठीतही तुम्ही कथा सांगायचा प्रयत्न करीत असता इथेही तेच असते. परंतु मराठी ही माझ्या राज्यापुरती मर्यादित असते पण हिंदीचे तसे नाही. केवळ भारतच नाही तर देशाबाहेरही याचे मोठे मार्केट आहे. याशिवाय दोन्हीत काही फरक नाही.

प्रश्न - सिरीज लाँच झाल्यानंतर प्रतिक्रिया कशा मिळत आहेत ?
प्रिया - फारच सुंदर प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. लोक दहाच्या दहा एपिसोड सलग पाहात आहे.

प्रश्न - पुन्हा या डिजीटल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर दिसणार का ?
प्रिया - हे मी आत्ताच काही सांगू शकणार नाही.प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते ती आल्यानंतर मी तुमच्याशी पुन्हा बोलेन. धन्यवाद.

Last Updated : May 11, 2019, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details