जालना :सध्या झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले भरून वाहत आहेत. अशातच, भोकरदन शहरातील तळेकर वस्तीला जोडणाऱ्या पुलाचे काम अर्धवट असल्याने वस्तीतील नागरिकांना शहरात ये-जा करणे अशक्य होत आहे. वस्तीतून शहराकडे जाणारा हा एकमेव मार्ग असल्याने येथील नागरिकांचे हाल होत आहे. या पूलावरील काम लवकरात लवकर पूर्ण करून मार्ग येथील नागरिकांच्या दळणवळणाकरता मोकळा करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तळेकर वाडीला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण करा; नागरिकांची मागणी - Bhokardan Municipal Council News
जिल्ह्याच्या भोकरदन शहरातील प्रभाग क्रं. 4 मधील तळेकर वाडी या वस्तीला जोडणाऱ्या पुलाचे काम मागील एक वर्षापासून चालू असून सध्यास्थितीत बंद आहे. त्यामुळे या वस्तीतील नागरिकांना दळण-वळणासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, या पुलाचे अर्धवट राहिलेले काम त्वरित पूर्ण व्हावे अशी मागणी नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
जिल्ह्याच्या भोकरदन शहरातील प्रभाग क्रं. 4 मधील तळेकर वाडी या वस्तीला जोडणाऱ्या पुलाचे काम मागील एक वर्षापासून चालू असून सध्यास्थितीत बंद आहे. त्यामुळे या वस्तीतील नागरिकांना दळण-वळणासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येऊन वस्तीचा शहर संपर्क तुटतो. सध्या, गावातून शेती उपयोगी साहित्य आणण्यासाठी शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. थोड्याच दिवसात शाळादेखील सुरू होण्याची शक्यता आहे. अशातच पुलाचे काम अर्धवट राहिले इथल्या विद्यार्थ्यांनाही शाळेपासून वंचित रहावे लागेल. तर, पर्यायी मार्ग नसल्यामुळे वाडीवर ये-जा करण्यासाठी या पुलाचे अर्धवट काम पूर्ण होणे खूप गरजेचे आहे.
या पुलाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण व्हावे अशी मागणी नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव, प्रभाकर तळेकर, गजानन तळेकर, मयूर आंबेकर, संजय पाथरे, आकाश तळेकर, हरिदास तळेकर आदी उपस्थित होते.