महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

चीनचा रॉकेट प्रक्षेपणाचा प्रयत्न अयशस्वी, उड्डानाच्या पहिल्याच टप्प्यात कोसळले - चीन रॉकेट प्रक्षेपण बातमी

चीनच्या वायव्येकडील जिऊकुआन प्रक्षेपण केंद्रावरून दुपारी 12 वाजून 17 मिनिटानी रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले होते. मात्र, उड्डानादरम्यान रॉकेटमध्ये बिघाड झाला.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 10, 2020, 5:58 PM IST

बीजिंग-घन इंधनावर रॉकेट (उपग्रह) प्रक्षेपणाचा चीनचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. उड्डानाच्या पहिल्याच टप्प्यावर रॉकेट कोसळले. कुआईझोऊ-11 या यानाद्वारे उपग्रह अवकाशात सोडण्यात येत होता. मात्र, हे उड्डान अपयशी झाले.

चीनच्या वायव्येकडील जिऊकुआन प्रक्षेपण केंद्रावरून आज(शुक्रवार) दुपारी 12 वाजून 17 मिनिटानी रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले होते. मात्र, उड्डानादरम्यान रॉकेटमध्ये बिघाड झाला. या रॉकेटमध्ये घन इंधन वापरण्यात आले होते. तसेच यासाठी खर्चही कमी आला होता.

या रॉकेटचे वजन 70.8 टन होते. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत रॉकेट सोडण्यात येणार होते. या प्रक्षेपणाच्या अपयशामागची कारणे अद्याप स्पष्ट झाले नाही. मागील आठवड्यात चीनने व्यावसायिक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

ABOUT THE AUTHOR

...view details