बीजिंग - अमेरिका आणि चीनमध्ये मागील काही दिवसांपासून विविध आघाड्यांवर संघर्ष सुरु आहे. दिवसेंदिवस दोन्ही देशांतील संबंध खालावत चालले आहेत. अमेरिकेने काल(बुधवार) ह्युस्टनमधील चिनी कौन्सलेट कार्यालय तत्काळ बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर आता चीनकडूनही वुहानमधील अमेरिकेचे कौन्सिलेट कार्यालय बंद करण्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, यासंबंधी अधिकृत वृत्त समोर आले नाही.
चीन अमेरिका संघर्ष...वुहानमधील अमेरिकेचे कौन्सिलेट कार्यालय चीन बंद करणार? - चीन अमेरिका संघर्ष
मागील काही दिवासांपासून चीन अमेरिकेमध्ये विविध मुद्यांवरून वाद वाढला आहे. व्यापार, कोरोनाचा उगम, दक्षिण चिनी समुद्रातील चीनची दादागिरी, हाँगकाँग कायदा, उईघुर मुस्लिम अत्याचार, तैवान शस्त्रविक्री, तिबेट प्रवेश अशा मुद्द्यांवरुन वाद वाढला आहे. दोन्ही देशांतील वाद कमी होण्याची कोणतेही चिन्ह दिसत नसून परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
अमेरिकेचा निर्णय अपमानकारक असून एकतर्फी असल्याचे म्हणत चीनने निषेध केला होता. अमेरिकेने निर्णय मागे घेतला नाही तर चीन प्रत्युत्तर देईल, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने इशारा दिला आहे. मागील काही दिवासांपासून चीन अमेरिकेमध्ये विविध मुद्यांवरून वाद वाढला आहे. व्यापार, कोरोनाचा उगम, दक्षिण चिनी समुद्रातील चीनची दादागिरी, हाँगकाँग कायदा, उईघुर मुस्लिम अत्याचार, तैवान शस्त्रविक्री, तिबेट प्रवेश अशा मुद्द्यांवरुन वाद वाढला आहे. दोन्ही देशांतील वाद कमी होण्याची कोणतेही चिन्ह दिसत नसून परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराला चीनला जबाबदार धरले असून चौकशीची मागणी केली आहे. तसेच अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पेओ चीनवर सतत हल्ला करत आहेत. भारबरोबरच्या चीनच्या आक्रमक धोरणाचाही पोम्पओ यांनी निषेध केला होता. नुकतेच चीनने 72 तासांच्या आत ह्युस्टन शहरातील चिनी कौन्सलेट बंद करण्याचा आदेश दिला. चीन जोपर्यंत आपली वर्तणूक बदल नाही, तोपर्यंत अमेरिका चीनवर निर्बंध घालतच राहिल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनकडून माहिती चोरीचा धोका असल्याचे कारण देत चिनी कार्यालय बंद करण्याच निर्णय घेण्यात आला आहे.