बीड- परळी शहरातील माऊली नागरी सहकारी पतसंस्थेत 3 कोटी 39 लाख रूपयाचा अपहार करणाऱ्या अध्यक्षासह 21 संचालक व चार कर्मचारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांकडुन पैसे घेऊन अफरातफर केल्याचा ठपका ठेवत परळी पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली.
याबाबत सविस्तार माहिती अशी आहे की, परळी शहरात गेल्या अनेक वर्षापासून माऊली नागरी सहकारी पतसंस्था कार्यरत आहे. पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे, असे ग्राहकांना भासवून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचे समोर आले आहे. मात्र, अनेक ग्राहकांना जेव्हा पतसंस्थेतून पैसे मिळत नव्हते तेव्हा चौकशी केली असता हा सगळा प्रकार समोर आला.