महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

जालन्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

आरोपीने 7 जूनला सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शिवनगर जुना जालना तिचा पाठलाग केला. तसेच बळजबरीने बोलण्याचा ही प्रयत्न केला. आरोपी एवढ्यावरच न थांबता या मुलीसोबत जवळीक साधून मुलीचे फोटो आणि व्हीडिओ चित्रीकरण केले.

jalna crime news
case filed against accused for minor girl abused at jalna

By

Published : Jun 10, 2020, 10:31 PM IST

Updated : Jun 10, 2020, 11:23 PM IST

जालना - अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून तिच्या सोबत बळ जबरीने बोलण्याचा प्रयत्न करणे, तसेच तिचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीत केल्याच्या आरोपावरून नूतन वसाहत भागात राहणाऱ्या एका तरुणाविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालन्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

या प्रकरणातील आरोपीने 7 जूनला सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शिवनगर जुना जालना तिचा पाठलाग केला. तसेच बळजबरीने बोलण्याचा ही प्रयत्न केला. आरोपी एवढ्यावरच न थांबता या मुलीसोबत जवळीक साधून मुलीचे फोटो आणि व्हीडिओ चित्रीकरण केले. त्याही पुढे जाऊन या अल्पवयीन मुलीचा वाईट हेतूने हात धरला. याप्रकरणी मुलीने कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने नूतन वसाहत भागात राहणाऱ्या एका तरुणा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनवळे हे करीत आहेत. दरम्यान, ही मुलगी आणि आरोपी तरुण हे शेजारी शेजारी राहत असल्यामुळे त्यांचे जाणे - येणे होते. शिवाय ते एकमेकांच्या परिचयाचेही होते. आरोपीने या ओळखीचा गैरफायदा घेत हे कृत्य केले आहे.

Last Updated : Jun 10, 2020, 11:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details