देहरादून - भारतीय सैन्य अकादमीची यंदाची पासींग परेड ही अतिशय वेगळ्या अंदाजात असणार आहे. यावेळी कॅडेट्सचे गुरू त्यांच्या पालकांची भूमिका साकारणार आहेत. मंगळवारी आयएमए देहरादून येथे डेप्युटी कमांडंट आणि मुख्य इन्स्ट्रक्टर यांनी परेड केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयएमएच्या कॅडेट्सनी चेहऱ्यावर मास्क लावत आणि सामाजिक अंतर राखत परेड केली. दरवर्षी जून आणि डिसेंबरमध्ये आयएमएमध्ये पासिंग आउट परेड आयोजित केले जाते. या परेडनंतर कॅडेट्स सैन्यात अधिकारी बनतात.
देहरादून आयएमएला 88 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. आयएमए मित्र देशांसह भारतीय सैन्यालाही अधिकारी देतो. 13 जूनला भारतीय सैन्य अकादमीच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला जाणार आहे. यावेळी आयएमएच्या पासिंग आउट परेडमध्ये काही नवीन परंपरांची सुरूवात होणार आहे.
आयएमएच्या पासिंग आउट परेडमध्ये सैनिकांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. आयएमएच्या कठोर प्रशिक्षणानंतर या कॅडेट्ससाठी सर्वात भावनिक क्षण म्हणजे जेव्हा त्यांचे कुटुंबीय त्यांच्या गणवेशात पदक लावतात. परंतू आयएमएच्या इतिहासात पहिल्यांदाच पीपिंग सोहळ्यादरम्यान अधिकारी कॅडेट्सच्या गणवेशावर रँक लावणार आहेत.